जवळील प्रेक्षणीय स्थळे


कार्तिक शुद्ध पोर्णिमा या दिवशी त्रिपुरारी पोर्णिमा साजरी केली जाते. भिमाशंकर क्षेत्रात त्रिपुरारी पोर्णिमा मोठ्या सोहळ्या सारखी साजरी केली जाते. भगवान शंकरानी त्रिपुरासुर दैत्याचा संहार या दिवशी केला होता आणि संहार करूनच शंकर विश्रांती साठी बसले. तेच हे स्वयंभू शिवलिंग भीमाशंकर. या दिवशी मंदिर ,गाभारा फुलांनी सजवले जाते आणि रोषणाई , आतिषबाजी ,महाआरती होते . देव स्वतः पालखीत बसून नगर प्रदक्षिणे साठी निघतात. पालखी सोहळा होऊन उत्सवाची सांगता होते . भिमाशंकर मध्ये इतर उत्सवा पेक्षा त्रिपुरारी पौर्णिमेला जास्त महत्व आहे. एकदा आवश्य भेट द्यावी असा हा सोहळा असतो. त्रिपुरी पौर्णिमेला देवाचा अभिषेक करावा अशी प्रथा आहे.